मराठी

नागरी सहकारी बँकांच्या विविध प्रश्‍नांवर शेगाव परिषदेत चर्चा

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरी सहकारी बँकांचे राज्यस्तरीय ..

पाणीपुरवठा कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी कृष्णात मोहिते

पाणीपुरवठा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक एस.डी. चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली झाली...

श्रीराम देशपांडे यांची एसईसीएलच्या संचालकपदी निवड

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स (एसईसीएल) कंपनीच्या संचालकपदी (स्वतंत्र कार्यभार) श्रीराम देशपांडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे..

लोकमंगल सहकारी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख तसेच जिल्हा उपनिबंधक..

भाग्यलक्ष्मी महिला बँक आयोजित प्रशिक्षण वर्ग यशस्वी

नागरी सहकारी बँकांच्या समस्या संघटित होऊन सोडविता येऊ शकतील आणि यासाठी संघटित होणे आवश्यक असल्याचे शरयूताई हेबाळकर यांनी स्पष्ट केले..

साखर उद्योगाने उपपदार्थ निर्मितीकडे वळण्याची गरज

साखर उद्योग जिवंत राहायचा असेल तर साखर कारखान्यांनी आता इथेनॉल उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणावर वळणे गरजेचे आहे, असा गर्भित इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे...

राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेतर्फे शालेय साहित्य वाटप

समाजातील सर्व घटकांना साथ देणार्‍या राणी लक्ष्मीबाई महिला सहकारी पतसंस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षातही सरस्वती विद्या मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले...

राजाभाऊ मंत्री पतसंस्थेच्या वार्षिक साधारण सभेत 15 टक्के लाभांश जाहीर

एरंडोल तालुक्यातील कै. राजाभाऊ मंत्री ग्रा. बि. शेती पतसंस्थेची 28 वी वार्षिक साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष किशोर मंत्री यांचे अध्यक्षतेखाली पार पडली...

नागरी बँकांच्या अडचणी राज्य सहकारी बँक सोडवणार

नागरी सहकारी बँकांसमोरील प्रश्‍नांचा राज्य शासन व रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी शिखर बँक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सहकार्य करेल,..

विधानसभा निवडणुकीपूर्वी रुपी बँकेचे विलीनीकरण व्हावे

येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रुपी बँकेच्या विलीनीकरणाचा विषय मार्गी लावण्यात यावा अशी मागणी रुपी बँक ठेवीदार हक्क समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली..

पतसंस्था वेल्फेअर असोसिएशनची कार्यशाळा संपन्न

पतसंस्था वेल्फेअर असोसिएशनच्या संचालकांची दोन दिवसीय कार्यशाळा येथे पार पडली. सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगांवकर, अध्यक्ष रविकाका बोरावके, प्रमुख पाहुणे डॉ. शांतीलाल सिंगी होते...

शेतकर्‍यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : सतीश मराठे

परस्पर स्नेह, विश्‍वास आणि समाजाचे कल्याण हा सहकाराचा पाया आहे. कृषी, उद्योग आणि प्रक्रियेच्या क्षेत्रात नव्या दमाने काम करण्याची वेळ आली आहे...

सहकारी बँकिंग क्षेत्राच्या खाजगीकरणाची गरज नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्डाचे संचालक सतीश मराठे यांचा बँकिंग विशेषत: सहकारी बँकिंग क्षेत्रातील विस्तृत अनुभव आहे. ते ‘सहकार भारती’चे संस्थापक सदस्य आहेत आणि अध्यक्षही होते...

श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक सीईओपदी राजेश लढ्ढा

बुलडाणा अर्बनचे सरव्यवस्थापक राजेश लढ्ढा यांनी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला...

महालक्ष्मी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संदीप कुलकर्णी

श्री महालक्ष्मी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संदीप कुलकर्णी व उपाध्यक्षपदी उदय महेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली...

मच्छिमार व्यावसायिकांसाठी केंद्राचे स्वतंत्र मंत्रालय

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मच्छिमार व्यावसायिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले असून मच्छिमार व्यावसायिकांसाठी किसान क्रेडिट कार्ड देण्याचे रिझर्व्ह बँकेने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे..

नागपुर नागरिक सहकारी बँकेच्या एनपीएमध्ये घट

चालू आर्थिक वर्षात ठेवी आणि कर्जवाटप मिळून 2289 कोटींची लक्ष्यपूर्ती केली आहे. बँकेने यंदा प्रभावी वसुली व्यवस्थापनाद्वारे एनपीए कमी करण्यात प्रगती केली असून 5.57 कोटी नफ्यासह..

पंचगंगा सहकारी बँकेच्या करपूर्व नफ्यात लक्षणीय वाढ

पंचगंगा बँकेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथे झाली. सभासद, ग्राहक, हितचिंतक यांनी दाखविलेल्या बँकेवरील विश्‍वासाने, कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांनी व सहकारी संचालकांच्या योगदानाने..

देशातील नागरी सहकारी बँकांसाठी शिखर संस्था स्थापन होणार

देशातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी वर्षअखेर एक शिख़र संस्था स्थापन होणार आहे. सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँक अशा दोन नियंत्रकांच्या कात्रीत सापडलेल्या नागरी सहकारी बँकांना..

दि विश्‍वेश्‍वर सहकारी बँकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

दि विश्‍वेश्‍वर सहकारी बँकेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. बँकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी सांगितले की..

थकीत रकमेसाठी नाशिक जिल्हा बँकेवर पतसंस्थांचे आंदोलन

जिल्हा बँकेत ठेव, राखीव निधी आणि तत्सम स्वरूपात ठेवलेली 300 कोटींहून अधिकची रक्कम मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेकडो पतसंस्थांवर आर्थिक संकट आले आहे..

जळगाव जनता बँकेच्या भडगाव शाखेचे उद्घाटन

जनता बँकेच्या भडगाव शाखेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी रा. स्व. संघ जळगाव जिल्हा सहसंघचालक डॉ. निलेश पाटील, विद्यमान नगराध्यक्ष अतुल पाटील, जे.डी.सी.सी..

कुंडलिका पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा सन्मान

गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच 38 वर्षे विनाअपघात सेवा करून जनतेच्या जिवाची काळजी घेणार्‍या एका राज्य परिवहन चालकाचा गौरव करून कुंडलिका पतसंस्थेने समाजाचे ऋण फेडले आहे..

जनता कमर्शिअल बँकेचे चिखली अर्बनमध्ये विलीनीकरण

येथील दि चिखली अर्बन सहकारी बँकेमध्ये जनता कमर्शिअल सहकारी बँकेचे नुकतेच समारंभपूर्वक विलीनीकरण करण्यात आले आहे...

खासगी बँकांप्रमाणे पतसंस्थांनी सिबिल प्रणाली वापरावी

खासगी बँकांप्रमाणे पतसंस्थांनी सिबिल प्रणाली वापरावी..

कोकणात सहकाराचा विस्तार व्हावा : आमदार प्रशांत ठाकूर

पश्‍चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र ज्या पद्धतीने विकसित झाले, त्याच धर्तीवर कोकणात सहकार क्षेत्राचा विस्तार व विकास झाला पाहिजे, असे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले...

सहकारी बँकांनी सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे काम करावे

नागरी सहकारी बँकांनी लहान उद्योजकांना त्याचप्रमाणे स्वयंसहायता महिला बचत गटांना अर्थसाहाय्य करून अशा घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणास हातभार लावावा, अशी अपेक्षा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केली आहे..

सहकारी पतसंस्थांसाठी आगामी काळ संक्रमणाचा

पतसंस्थेकडे चांगल्या कर्जदाराकडून कर्जाची मागणी असेल तरच ठेवी वाढविण्याचा प्रयत्न करा. कारण चांगले कर्जदार पतसंस्था नंतर शोधेल किंवा पतसंस्थेकडे आपोआप येतील या आशेवर नवीन ठेवी स्वीकारल्या,..

सहकाराचा उगम आणि मुक्त अर्थव्यवस्थेतील स्थान

आपल्या भारत देशामध्ये सहकार चळवळीचा प्रारंभ 19 व्या शतकाच्या अखेरीस झाला. सन 1855 ते 1885 या कालावधीत जर्मनीमधील हर्मन शूूल्झ आणि इटालीतील लुईगी लुझाटी..

राज्य सहकारी बँक असोसिएशन संचालकांची यवतमाळ अर्बन बँकेला सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक मंडळाने यवतमाळ अर्बन बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली...

पेमेंट बँकांचा ‘अपमृत्यू’

पेमेंट बँकांचा ‘अपमृत्यू’..

दि महाराष्ट्र ऐक्यवर्धक पतसंस्थेला 25 लाखांचा नफा

दि महाराष्ट्रीय ऐक्यवर्धक सहकारी पतपेढी या संस्थेची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र अर्जुन पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पतपेढीने सन 2018-2019 या आर्थिक वर्षात तीन कोटींचा व्यवसाय केला आहे...

जोखीम व्यवस्थापन : बँकांची आवश्यक गरज

बँकांना जोखीम पत्करू देऊ नये. त्यांच्या दिवाळखोरीची किंमत समाजाला भरावी लागते. हे मत आहे जगप्रसिद्ध निबंधकार, जोखीम व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक आणि ब्लॅक स्वान या पुस्तकाचे लेखक नसीम तलेब यांचे..

केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्रासाठी विविध योजना

भारत कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारतीय शेतीमधील अनेकविध प्रकार, त्यांची गरज, करण्याची पद्धत यांसह अनेक छोट्यामोठ्या गोष्टी जगातील अनेकांना अचंबित करणार्‍या आहेत. ..

मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण निश्‍चित

महाराष्ट्राच्या समुद्रात किनार्‍यावरील ससेमिक सर्व्हे बाधित मच्छिमारांना भरपाई मिळावी याकरिता शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास व्हावा म्हणून सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट यांना नियुक्त करण्याचे ठरविण्यात आले आहे. पारंपरिक मच्छिेमारांच्या नुकसानीचे ते आलेखन करून देणार आहेत...

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा

येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिनी एटीएमची सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे...

बुलडाणा, वर्धा, नागपूर जिल्हा बँकांनी शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करावा : मुख्यमंत्री

शेतकर्‍यांच्या हितासाठी बुलडाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करून शेतकर्‍यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले...

‘बदलते बँकिंग, नव भारतासाठी’ सहकारी बँक परिषद

‘बदलते बँकिंग नव भारतासाठी’ या संकल्पनेतून नागरी सहकारी बँकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध सेवा पुरवण्यासाठी तत्पर असलेल्या युनाइट्स बिझनेस सोल्युशन्स कंपनीने नुकतीच ठाणे येथे परिषद घेतली. या परिषदेचे उद्घाटन पंजाब नॅशनल बँकेचे माजी अध्यक्ष के. आर. कामत यांनी केले. या प्रसंगी सीए वरदराज बापट, लक्षवेधचे अतुल राजोळी व युनाइट्सचे संजय ढवळीकर उपस्थित होते...

पुणे कमर्शिअल बँक सहकाराचा नावलौकिक वाढवेल आरबीआय संचालक सतीश मराठे यांचा विश्‍वास

पुणे कमर्शिअल बँक या नव्या नावाबरोबरच ग्राहकसेवेचे उल्लेखनीय कार्य करणारी पूर्वाश्रमीची शिवनेरी बँक सहकार क्षेत्रात नावलौकिक पटकावेल, असा आशावाद रिझर्व्ह बँकेचे संचालक व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सतीश मराठे यांनी व्यक्त केला आहे..

देवगिरी नागरी सहकारी बँक अध्यक्षपदी किशोर शितोळे

येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री. किशोर शितोळे व उपाध्यक्षपदी श्री. संजय गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले...

जनता अर्बन बँकेचा कर्मचारी स्नेहमेळावा साजरा

जनता अर्बन को-ऑप. बँकेचा कर्मचारी मेळावा नुकताच पाचवड येथे झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश शिंदे, (क्रिएटिव्ह डायरेक्टर-नोबीस ब्रॅन्डकॉम पुणे) व शाम भुरके, (बँकिंग तज्ज्ञ) उपस्थित होते...

सहकारातील दूध व्यावसायिकांनी संघटित व्हावे : मराठे

सहकारातील दुग्ध व्यवसाय हे समाज परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. या क्षेत्रात देशाने लक्षणीय प्रगती केली असल्याने भविष्यामध्ये दुग्ध व्यवसायातील कार्यकर्त्यांनी संघटित होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करावे, असे आवाहन आरबीआयचे सतीश मराठे यांनी केले आहे...

राज्य सहकारी बँकेची उस्मानाबाद शाखा कार्यरत

राज्य सहकारी बँकेची 50 वी उस्मानाबाद जिल्हा शाखा नुकतीच कार्यरत झाली आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मंडळाचे सदस्य ए.एल.महागांवकर, संजय भेंडे, बँकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते..

सुधारित सहकार लेखापरीक्षण कार्यपद्धतीस शासनाची मान्यता

सहकार चळवळीच्या गुणात्मक वाढीसाठी, संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती सक्षम होण्यासाठी, सहकाराची तत्त्वे व मूल्यांची जपणूक करण्यासाठी सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण महत्त्वाचे आहे. ‘सुधारित सहकारी लेखापरीक्षण कार्यपद्धती’स शासनाने नुकतीच मान्यता दिल्याची माहिती सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी सांगितली...

राज्य सहकारी बँकेतर्फे पुण्यात साखर परिषदेचे आयोजन

राज्यातील यशस्वी साखर कारखान्यांची आणि त्याचप्रमाणे अडचणीतील साखर कारखान्याच्या प्रश्‍नांची मांडणी करण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या वतीने दि. 5 ते 7 जुलै या कालावधीत प्रथमच दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे...

वाई अर्बन बँकेचा एक हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण

वाई अर्बन को-आँप. बँकेने ठेवींचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष चार्टर्ड अकौंटंट चंद्रकांत काळे यांनी सांगितली...

पतसंस्थांसाठी स्वतंत्र नियामक मंडळाची आवश्यकता काय? : ओमप्रकाश (काका) कोयटे

पतसंस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळाची खरंच गरज आहे का, असा प्रश्‍न राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी उपस्थित केला आहे. श्री. कोयटे म्हणाले की, नियामक मंडळाच्या वतीने ज्या अटी पतसंस्थांवर लादल्या जाणार आहेत, त्यापूर्वी चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच अटींची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे...

सहकारातील विविध घटकांचे प्रतिबिंब केंद्रीय अर्थसंकल्पात उमटावे : सहकार भारतीची मागणी

सहकार क्षेत्रातील विविध घटकांना भेडसावणार्‍या समस्यांचा तसेच महत्त्वपूर्ण बाबींचा गांभीर्याने विचार केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात यावा, अशी मागणी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रमेश वैद्य आणि महासचिव डॉ. उदयराव जोशी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे...

सीए चंद्रकांत काळे ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दि वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष, किसन वीर सातारा सहकारी साखर उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक व सहकार भारती सातारा जिल्हाध्यक्ष चार्टर्ड अकौटंट चंद्रकांत काळे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या सहकार भूषण : दि प्राइड ऑफ इंडिया भास्कर अ‍ॅवार्ड या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ..

यवतमाळ अर्बन बँकेतर्फे लघू व्यवसायासाठी त्वरित कर्ज

यवतमाळ अर्बन बँकेने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. 2018-19 या सरत्या वर्षात बँकेच्या एकूण ठेवी रु. 2363 कोटी असून कर्ज रु. 1599 कोटी इतके आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय रु. 3960 कोटी झाला आहे. तसेच बँकेला ढोबळ नफा रु. 52.74 कोटी झाला आहे. बँकेचे खेळते भांडवल रु. 2726.99 कोटींपर्यंत पोहोचले आहे..

सहकारी संस्थांची टेस्ट ऑडिटमधून सुटका

राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाबाबत तत्कालीन सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे यांनी 25 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार दरवर्षी एकूण संस्थांच्या 20 टक्क्यांइतक्या संस्थांचे चाचणी लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले होते...

सरस्वती महिला पतसंस्था आयोजित, सहकार प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत अलकाताई मुरुमकर प्रथम

येथील सरस्वती महिला पतसंस्थेच्या वतीने सहकार प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहकार भारतीच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत महिला प्रमुख अलकाताई मुरुमकर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत एकूण 37 स्पर्धकांचा सहभाग होता. दि. 2 ते 31 मे या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली...

ग्राहकांनी पतसंस्थांकडूनच कर्ज घ्यावे, सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे आवाहन

सोलापूर शहर व जिल्ह्यात सावकार आणि फायनान्सवाल्यांनी गरीब व गरजू लोकांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देण्याचा धंदा जोरात सुरू ठेवला आहे. सावकारी लोकांना तसेच फायनान्सवाल्यांना कायदेशीरदृष्ट्या ठेवी स्वीकारता येत नाहीत...

डेबिट कार्ड सुरक्षा - 1

इंटरनेटच्या माध्यमातून आपण खरेदी-विक्रीसाठी नेहमी लॅपटॉप, डेस्कटॉप, पीडीएफ आणि मोबाइलचा वापर करतो. वरील सर्व उपकरणे असुरक्षित वातावरणामध्ये वापरल्यामुळे डेबिट कार्डची माहिती चोरली जाऊ शकते. बँकेत असलेली डेबिट कार्डची माहिती सुरक्षित न ठेवल्यामुळे ग्राहकांना धोका निर्माण होऊ शकतो...

जळगाव जिल्हा अर्बन बँक्स असोसिएशन, सहकार भारती आयोजित स्नेह मेळावा यशस्वी

महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे कार्य व्यापक प्रमाणात विस्तारित असून सहकारी बँकांचे कर्मचारी वर्ग एकत्रित यावेत, या हेतूने जळगाव जिल्हा अर्बन को-ऑप. बँक्स असोसिएशन व सहकार भारती यांचे वतीने जिल्ह्यातील सभासद बँकांचे साहाय्यक कर्मचारी यांचेसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते...

संत गाडगे महाराज पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार

संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ सदस्यांना गौरविण्यात आले. माजी प्राचार्य विश्‍वास सायनाकर, सांगली अर्बन बँक माजी संचालक अण्णा वेळगी, सांगली जिल्हा सहकार भारती संघटक एच.एन.सोनटक्के, आदी या वेळी उपस्थित होते...

धुळे सहकार भारतीतर्फे कामगारांचा सन्मान

सहकार भारतीतर्फे सहकार क्षेत्रातील चतुर्थ श्रेणी कामगारांचा सन्मान करून कामगार दिन साजरा करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून सहकार भारती शिरपूर जिल्हा धुळेच्या वतीने सहकार क्षेत्रातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा व वर्तमानपत्र वाटप करून शिक्षण घेत असलेल्या युवकांचा महाराष्ट्रदिनी सन्मान करण्यात आला...

सहकारी बँक वेतन मंडळाची भूमिका महत्त्वाची : सतीश मराठे

सहकारी बँका या चांगल्या रीतीने चालाव्यात यासाठी चांगले औद्योगिक संबंध असणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकार बँक वेतन मंडळ महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले. ..

स्मिता देशपांडे यांना उत्कृष्ट बँक कर्मचारी पुरस्कार प्रदान

दि महाराष्ट्र राज्य को ऑप. बँक्स असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे कै. बापू रावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार सन 2016-17 हा भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्मिता देशपांडे यांना मुंबई येथे रविंद्र नाट्य मदिर येथेे झालेल्या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला...

जनकल्याणची पुणे शहरातील वाटचाल...

सोलापूरच्या जनकल्याण समिती बचत गटाचे कार्य 1998 पासून सुरू झाले. सोलापूर शहर व परिसरातील गरीब, गरजू, निरक्षर महिलांची बँकेमध्ये खाती उघडून घेऊन बचतीची सवय लावणे व त्यातून गरजेनुसार छोटी कर्जे घेऊन बचत गट चालवणे सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सिंहगड रोड येथे 2016 पासून एक शाखा कार्यान्वित झाली...

खामगाव अर्बन बँकेचे डाटा सेंटर कार्यरत

खामगाव अर्बन बँकेने सुसज्ज डाटा सेंटर उभारून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना अधिकाधिक जलद सेवा देण्याचे दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बँक लवकरच मुंबई, अहमदाबाद, राजकोटसारख्या व्यापारी शहरांत शाखाविस्तार करेल, असा विश्वास सहकार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता यांनी खामगाव अर्बन बँक मुख्य कार्यालय येथे इमारत नूतनीकरण व डाटा सेंटरचे उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आशिष चौबिसा होते...

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सहकार ध्वज प्रदान

सहकार भारती संपर्क अभियानांतर्गत राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांना सहकार ध्वज प्रदान करण्यात आला. येथे शासकीय दौर्यानिमित्त आलेल्या सहकारमंत्र्यांना यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात चालू असलेल्या विविध कार्यक्रम, उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री मदनभाऊ येरावार, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते. ..

विजय नागरी पतसंस्थेमुळे महिला बनल्या स्वयंसिद्धा

फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर अवास्तव व्याजाचा राक्षस मानगुटीवर बसल्यानंतर त्यांचे दुष्परिणाम समाजात अनेक ठिकाणी दिसतात. मात्र, या जोखडातून महिलांना मुक्त करत त्यांना येथील विजय नागरी पतसंस्थेने नवा आर्थिक सक्षमतेचा मंत्र दिला. अडीच वर्षांच्या काळात अडीच हजारांवर महिला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सांभाळत स्वयंसिद्धा बनल्या आहेत. संस्थेने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जवळपास साडेतेरा कोटींच्या आसपास कर्ज वितरण केले...

कर्तृत्वाची उत्तुंग भरारी

संसाराबरोबरच आपल्यातील कलागुणांची आवड जपण्यासाठी काही महिला सातत्याने धडपड करत असतात आणि त्यात यशस्वीही होतात. अशा महिलांमध्ये सौ. माधुरी विलास हावरे यांचे नाव प्रेरणादायी व आदर्शवत आहे. गुणवत्तापूर्ण मालाची निर्मिती करून ग्राहकांना अनोखी भेटच त्यांनी दिली आहे. माधुरीताई गेल्या 32 वर्षांपासून स्वेटर्स व शालींचा व्यवसाय करत आहेत. त्यात त्यांनी स्वतंत्र ब्रँडही निर्माण केला आहे...

महेश महिला नागरी सह. पतसंस्थेची रौप्यमहोत्सवी वाटचाल

विजयते हे ब्रीदवाक्य ठेवून महेश महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल १९९४ साली सुरू झाली. २००३ पासून अॅड. सौ. शोभाताई लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली काम वेगाने सुरू झाले. एका छोट्याशा जागेत सुरू झालेली संस्था अल्पावधीत पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्ववास्तूमध्ये स्थलांतरीत झाली. ३००० चौ. फू. जागेत संस्थेचे मुख्य कार्यालय व नाना पेठ शाखा कार्यरत आहे. पतसंस्थेची लॉकर सुविधा सभासदांसाठी उपलब्ध आहे. पतसंस्थेच्या एकूण तीन शाखा असून चालू वर्षी तीन नवीन शाखांना मंजुरी मिळालेली आहे...

सामाजिक संस्थांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभे करा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

“अनेक संस्था समाजासाठी चांगले काम करत आहेत. या संस्थांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने क्षमतेप्रमाणे आपल्या उत्पन्नातील वाटा या सामाजिक संस्थांना अर्पण केला पाहिजे,’’ असे आग्रही प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे स्पष्ट केले...

महाशक्ती स्वयंसहायता गट / बचत गट

आजच्या काळात ‘लक्ष्मी देवो भव’ म्हणणारी संस्कृती होत चालली आहे व सर्व जण लक्ष्मीच्या मागे पळत आहेत, अशी ही लक्ष्मी म्हणजेसुद्धा स्त्रीच आहे आणि एकीकडे तिची पूजा आणि दुसरीकडे? पक्ष हे खर आहे. स्त्री म्हणजे मुलांना जन्म देणारी, घर पाहणारी आणि सेवाधर्म निभावणारी शांती, सुख पाहणारी, अशी सर्व गुणसंपन्न गृहिणी आहे. थोड्या शिक्षणाने सुद्धा तिच्या लक्षात आले की माझ्या कुटुंबाचे आर्थिक स्वास्थ्य टिकवायचे जायचे असेल तर मला बाहेर पडले पाहिजे. कारण काही मागितल्याशिवाय मिळत नाही. आम्ही मैत्रिणी एकत्र आलो तर काही ..

महिलांच्या आर्थिक सबलीकरणात बँकांची भूमिका

फार पूर्वी म्हणजे ४९-५० वर्षांपूर्वी महिलांच्या बुद्धिमत्तेविषयी फारशी चर्चा होत नसे. कारण ती सिद्ध व्हायला स्त्रियांना संधी नव्हती. घरापलीकडील जग तिला ज्ञात नव्हते. पण स्त्रिया जशा शिकल्या, आत्मनिर्भर झाल्या, तसा त्यांचा विकास होत गेला अबला सबला झाल्या आणि हा बदल वेगाने होत राहिला. जगाचा वेग वाढला आणि आपल्या जीवनाची गणितेही बदलायला लागली. प्रत्येक गोष्टीचे निकष बदलले. सर्वसामान्यपणे प्रगतीचा मार्ग घरातूनच सुरू होतो आणि ज्या संस्कारांची शिदोरी पुढील आयुष्यात उपयोगी पडते, ते संस्कार आपल्या आईकडूनच ..

पटना में सहकार भारती राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक सम्पन्न

सहकार भारती राष्ट्रीय कार्यकारिणी समिति की बैठक का आयोजन पटना स्थित आईसीएम डी.एन. सिंह संस्था में किया गया था। जिसमें आयोजित समापन समारोह में केंद्रीय कृषि तथा सहकारिता मंत्री राधा मोहन सिंह जी ने शिरकत की। सहकार भारती के महासचिव डा. उदयराव जोशी जी ने अपने प्रास्ताविक में सालभर में संपन्न हुये कार्यक्रमों के बारे में जानकारी दी और आगामी कार्यक्रमों की चर्चा की।..

केंद्रीय अर्थसंकल्पावर सहकार भारती पुणे महानगरतर्फे चर्चासत्र संपन्न

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सहकार क्षेत्राच्या दृष्टीने कोणतीही ठोस तरतूद नसल्याचे सीए सुधीर पैठणकर यांनी सांगितले. सहकार भारती पुणे महानगरतर्फे स्थापना दिनानिमित्त ‘केंद्रीय अर्थसंकल्प आणि सहकारी संस्था’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे होते. पुणे महानगर अध्यक्ष सुनील रुकारी, संघटन सचिव दीपक अहिर, सहकार सुगंधचे संपादक व सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख भालचंद्र कुलकर्णी होते...