देवगिरी नागरी सहकारी बँक अध्यक्षपदी किशोर शितोळे

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:21-Sep-2019
औरंगाबाद :
येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री. किशोर शितोळे व उपाध्यक्षपदी श्री. संजय गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. श्री. शितोळे यांच्या निवडीबद्दल सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.