जनता अर्बन बँकेचा कर्मचारी स्नेहमेळावा साजरा

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:21-Sep-2019

 
 
वाई : जनता अर्बन को-ऑप. बँकेचा कर्मचारी मेळावा नुकताच पाचवड येथे झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश शिंदे, (क्रिएटिव्ह डायरेक्टर-नोबीस ब्रॅन्डकॉम पुणे) व शाम भुरके, (बँकिंग तज्ज्ञ) उपस्थित होते.
 
बँकेचे संस्थापक-संचालक सुरेश कोरडे, अध्यक्ष यशवंत सपकाळ, संचालक शामराव बनकर, बळीराम जगताप, डॉ. विकास फरांदे, तज्ज्ञ संचालक अभिनाथ शिंदे यांच्यासह संतोष पिसाळ, अण्णासाहेब फरांदे उपस्थित होते.
 
श्री. शिंदे यांनी कर्मचारी वर्गास ऊर्ळींशीींळीळपस चरीज्ञशीींंळपस-इीरपवळपस या बाबत मार्गदर्शन केले. बँकेच्या विविध योजनांची जाहिरातबाजी, अत्याधुनिक साधनांचा अत्यंत सुलभपणे वापर करत बँक व्यवसायवाढ करण्याबाबत त्यांनी कर्मचारी वर्गास सांगितले. 
 
श्री. भुरके यांनीदेखील विविध उदाहरणे देत बँक व्यवसायवाढ करण्याकरिता बँक कर्मचारी यांनी कशा प्रकारे प्रयत्नशील राहावे, ग्राहकांशी कशा प्रकारे संबंध प्रस्थापित करावेत, तसेच बँक कामकाज करताना कर्मचारी वर्गाने अत्यंत प्रसन्न व आनंदी राहावे, या बाबत मार्गदर्शन केले. 
 
संस्थापक-संचालक सुरेश कोरडे व तज्ज्ञ संचालक अभिनाथ शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. साहाय्यक सरव्यवस्थापक संतोष लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार अध्यक्ष यशवंत सपकाळ यांनी मानले.