आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:21-Sep-2019
 
 
 
अलिबाग : येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिनी एटीएमची सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे.
पतसंस्थेच्या चेंढरे शाखेचा 13 वा वर्धापन दिन आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्या शुभ हस्ते एटीएम सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, तसेच संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
 
आदर्श भवन येथे रक्तदान तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 51 रक्तदात्यांनी रक्तादान केले. 120 जणांची नेत्रचिकित्सा करण्यात आली.
 
कुरुळ ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. जनार्दन पाटील, उपसरपंच स्वाती पाटील, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक सुरेश गावंड, संचालक अभिजित पाटील, संचालक विलास सरतांडेल, कुरुळ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, आदर्श पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.