बुलडाणा, वर्धा, नागपूर जिल्हा बँकांनी शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करावा : मुख्यमंत्री

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:21-Sep-2019
मुंबई : शेतकर्‍यांच्या हितासाठी बुलडाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करून शेतकर्‍यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बुलडाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणींसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बुलडाणा, वर्धा आणि नागपूर या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये बीसी मॉडेल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने दोन दिवसांत नाबार्डकडे पाठवावा, नाबार्डने शेतकर्‍यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.