राज्य सहकारी बँकेची उस्मानाबाद शाखा कार्यरत

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:20-Sep-2019
उस्मानाबाद :
राज्य सहकारी बँकेची 50 वी उस्मानाबाद जिल्हा शाखा नुकतीच कार्यरत झाली आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मंडळाचे सदस्य ए.एल.महागांवकर, संजय भेंडे, बँकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
 
सहकारमंत्री देशमुख यांनी सहकार विद्यापीठाच्या नियोजित प्रकल्पासंबंधी समाधान व्यक्त केले. तसेच बँकेच्या वाटचालीबद्दल आनंद व्यक्त केला. श्री. अनास्कर यांनी बँकेच्या वर्षभरातील विविध बाबींचा आढावा घेतला. राज्यात बँकेच्या 31 जिल्हा शाखा कार्यरत असल्याचे सांगितले.