यवतमाळ अर्बन बँकेतर्फे लघू व्यवसायासाठी त्वरित कर्ज

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019
यवतमाळ : यवतमाळ अर्बन बँकेने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. 2018-19 या सरत्या वर्षात बँकेच्या एकूण ठेवी रु. 2363 कोटी असून कर्ज रु. 1599 कोटी इतके आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय रु. 3960 कोटी झाला आहे. तसेच बँकेला ढोबळ नफा रु. 52.74 कोटी झाला आहे. बँकेचे खेळते भांडवल रु. 2726.99 कोटींपर्यंत पोहोचले आहे. 
 
शहरी व ग्रामीण भागातील उद्योजक, व्यावसायिक, प्रगतिशील शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना यवतमाळ अर्बन बँकेकडून अर्थसाहाय्य केले जाते. बँकेच्या व्यवसायासोबत सामाजिक जाणिवेतून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. बाळासाहेब देवरस लघू व्यवसाय कर्ज योजनेत बँक रु. 50,000/- चे कर्ज त्वरित उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे बँकेने अनेक छोट्या उद्योजकांना सहकार्य केले आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकरी कुटुंबांना मदत करण्यास बँक नेहमीच आघाडीवर असते.
 
बँकेचे व्याजदर हे इतर बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक असून बँकेने व्याजदरात कपात करून डॉक्टर व सीए यांना 11 टक्के तसेच लघू व्यावसायिकांकरता बाळासाहेब देवरस कर्ज योजनेचा व्याजदर 12 टक्के असून या योजनेअंतर्गत नियमित परतफेड केल्यास वार्षिक लागलेल्या व्याजाच्या 10 टक्के सूट देऊन कर्जाचा व्याजदर 10.80 टक्के होईल.