संत गाडगे महाराज पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019

 
 
सांगली (शिराळा) : येथील संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ सदस्यांना गौरविण्यात आले.
 
माजी प्राचार्य विश्‍वास सायनाकर, सांगली अर्बन बँक माजी संचालक अण्णा वेळगी, सांगली जिल्हा सहकार भारती संघटक एच.एन.सोनटक्के, आदी या वेळी उपस्थित होते.
 
अ‍ॅड. जे. डी. परीट यांनी स्वागत, तर संचालक विष्णू यादव यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डी. बी. परीट यांनी पतसंस्थेविषयी माहिती सांगितली. उपाध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. 
 
पतसंस्थेचा स्वनिधी 350 लाख, गुंतवणूक 700 लाख, 55 लाख रु. नफा, 1450 लाख रु. कर्ज, 1650 लाख रु. ठेवी आणि खेळते भांडवल 2700 लाख रु. आहे, तर वार्षिक व्यवसाय 3100 लाख रु. आहे आणि वार्षिक उलाढाल 7500 लाख रु. इतकी आहे, असे या वेळी सांगण्यात आले.