जळगाव जिल्हा अर्बन बँक्स असोसिएशन, सहकार भारती आयोजित स्नेह मेळावा यशस्वी

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019

 
 
जळगाव : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे कार्य व्यापक प्रमाणात विस्तारित असून सहकारी बँकांचे कर्मचारी वर्ग एकत्रित यावेत, या हेतूने जळगाव जिल्हा अर्बन को-ऑप. बँक्स असोसिएशन व सहकार भारती यांचे वतीने जिल्ह्यातील सभासद बँकांचे साहाय्यक कर्मचारी यांचेसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
सहकार भारतीचे महासचिव डॉ. उदय जोशी यांनी उद्घाटन केले. अध्यक्ष म्हणून संजय बिर्ला उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र पाटील अ. भा. बँक प्रकोष्ठ प्रमुख, पी. बी. बागुल (उपनिबंधक, सहकारी संस्था) उपस्थित होते.
 
सहकार क्षेत्राची वाढ देशात अजून झाली पाहिजे. तसेच सहकार क्षेत्राला विशिष्ट दर्जा मिळाला पाहिजे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. इतर कोणत्याही क्षेत्रात असे उपक्रम राबविले जात नाहीत. आपण आपल्या संस्थेत प्रामाणिकपणे व विश्‍वासाने काम करावे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
 
बँकांमध्ये काम करणार्‍या प्रत्येक घटकासाठी असे उपक्रम राबविण्यात आले पाहिजेत. तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे व त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. साहाय्यक कर्मचारी यांची संस्थेशी नाळ जुडलेली असते. ग्राहक ओळखण्याची कला त्यांचेकडे असते. माहिती तंत्रज्ञान आपण विकत घेऊ शकतो, पण साहाय्यक कर्मचारी यांचे काम आपण विकत घेऊ शकत नाही. तसेच साहाय्यक कर्मचारी यांनी नवीन तंत्रज्ञानानुसार काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे श्री. बिर्ला म्हणाले.
 
असोसिएशनचे अध्यक्ष सतिश मदाने, उपाध्यक्ष पंकज मुंदडा, संचालक दादा नेवे, चंद्रहासभाई गुजराथी, ज्ञानेश्‍वरभाऊ महाजन, डॉ. प्रवीण कुडे, शांताताई वाणी, सुरेश झोपे, प्रा. जे. एम. अग्रवाल, आर. जे पवार, लालचंद सैनानी, प्रकाश कोठारी, सचिन पानपाटील, अ‍ॅड. विकास देवकर, जिल्हा संघटन प्रमुख, सहकार भारतीे उपस्थित होते. जिल्ह्यातील सहकारी बँकांचे साहाय्यक कर्मचारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.