धुळे सहकार भारतीतर्फे कामगारांचा सन्मान

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019

 
 
 
शिरपूर : सहकार भारतीतर्फे सहकार क्षेत्रातील चतुर्थ श्रेणी कामगारांचा सन्मान करून कामगार दिन साजरा करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून सहकार भारती शिरपूर जिल्हा धुळेच्या वतीने सहकार क्षेत्रातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा व वर्तमानपत्र वाटप करून शिक्षण घेत असलेल्या युवकांचा महाराष्ट्रदिनी सन्मान करण्यात आला.
 
शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावातील 105 वर्षांपासून शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची कामगिरी करून अनेक पारितोषिके मिळविलेल्या वि. का. सोसायटीतील शिपाई प्रल्हादसिंग राजपूत, महावीर पतसंस्थेत दहा वर्षांपासून कार्यरत श्रीमती माहेश्‍वरी, पीक संरक्षण सोसायटीचे शिपाई आसाराम भिल, मर्चंट्स बँकेचे शिपाई संदीप पाटील, वर्तमानपत्र वाटप करून सिव्हिल डिप्लोमा करीत असलेला पवन राजपूत, गेल्या वीस वर्षांपासून पेपर वाटप करणारे विजू गुजराथी, विकास पावरा यांचा सन्मान सहकार भारतीतर्फे दिलीप लोहार (उत्तर महाराष्ट्र प्रांत संघटन प्रमुख), मोहनराव पाटील (जिल्हा उपाध्यक्ष सहकार भारती धुळे), सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते राजेंद्र देवरे, विजयसिंग पाटील, चेअरमन जनकल्याण पतसंस्था, किशोर ठाकरे, दिलीप चौधरी इत्यादी पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आला.