डेबिट कार्ड सुरक्षा - 1

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019

 
 
इंटरनेटच्या माध्यमातून आपण खरेदी-विक्रीसाठी नेहमी लॅपटॉप, डेस्कटॉप, पीडीएफ आणि मोबाइलचा वापर करतो. वरील सर्व उपकरणे असुरक्षित वातावरणामध्ये वापरल्यामुळे डेबिट कार्डची माहिती चोरली जाऊ शकते. बँकेत असलेली डेबिट कार्डची माहिती सुरक्षित न ठेवल्यामुळे ग्राहकांना धोका निर्माण होऊ शकतो.
 
ग्राहकांची डेबिट कार्डची माहिती चोरीला जाऊन ती हॅकर्सच्या वेबसाइटवर विक्रीला असल्याचे बर्‍याच वेळा दिसून येते. अशा वेबसाइटवर बँकेतील संगणक विभागातील कर्मचार्‍याने त्याची देखरेख करणे बंधनकारक आहे. आपल्या बँकेतील डेबिट कार्डची माहिती या वेबसाइटवर आढळल्यास ते डेबिट कार्ड त्वरित बंद करणे व ग्राहकास त्या संदर्भात प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
 
आपल्या ग्राहकाच्या डेबिट कार्डची माहिती हॅकर्सच्या वेबसाइटवर प्रत्यक्ष बघण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीचा आधार घ्यावा.
 
1) बँकेच्या लॅपटॉपवर ओपन ऑपरेटिंग सिस्टिम (Unix / linux/ / Redhat linux / Kali Linux..etc) लोड करावी. त्या लॅपटॉपवर बँकेच्या संदर्भातील किंवा इतर कुठलीही माहिती साठवलेली नसावी. 
2) माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरत असलेले ब्राउझर (Chrome, Firefox , Internet Explorer) न वापरता TOR हे ब्राउझर डाउनलोड करावे व तेच ब्राउझर वापरावे.
3) ज्या लॅपटॉपवर TOR ब्राउझर वापरणार आहे तो लॅपटॉप बँकेच्या नेटवर्कमध्ये (LAN) जोडलेला नको. तसेच इंटरनेट जोडण्यासाठी डेटा कार्ड वापरावे.
4) TOR ब्राउझरमध्ये खालील वेबसाइट ओपन करावी.
http://xgibbpo4tpg4j7mj.onion/cc
5) या वेबसाइटवर नवीन अकाउंट ओपन करावे.
6) अकाउंट नाव व पासवर्ड टाकून वेबसाइट ओपन करावी.
7) स्क्रीनवर असलेल्या सीव्हीव्ही या ऑप्शनवर क्लिक करावे.
8) कंट्री या ऑप्शनमध्ये इंडिया सिलेक्ट करावे व सर्च या बटनावर क्लिक करावे.
9) आपल्या बँकेचे नाव व डेबिट कार्ड यांचा शोध घ्यावा, बँकेच्या डेबिट कार्डचा डेटा सापडल्यास ते डेबिट कार्ड त्वरित बंद करावे. ग्राहकास या संदर्भात प्रशिक्षण द्यावे.
 
TOR ब्राउझरचा वापर भारतामध्ये कायदेशीर असला, तरी त्या माध्यमातून हॅकिंग केल्यास कायद्याने गुन्हा आहे.
 
अशा पद्धतीने संगणक विभागातील कर्मचारी यांनी नेहमीच अशा वेबसाइटवर देखरेख ठेवावी व आपली बँक आणि ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : 92252 46815