सीए चंद्रकांत काळे ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019

 
 
वाई : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दि वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष, किसन वीर सातारा सहकारी साखर उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक व सहकार भारती सातारा जिल्हाध्यक्ष चार्टर्ड अकौटंट चंद्रकांत काळे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या सहकार भूषण : दि प्राइड ऑफ इंडिया भास्कर अ‍ॅवार्ड या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. 
 
समारंभास माजी केंद्रीय कायदामंत्री अँड. रमाकांत खलप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भगिनी वासंतीबेन मोदी, सामाजिक कार्यकर्त्या सारिका मिंडा, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे संस्थापक राजेंद्र लोहार यांची उपस्थिती होती. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करीत राहावे. महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनसारख्या सामाजिक संस्था आपल्या कार्याची दखल घेत असतात. सहकार, बँकिंग व सामाजिक क्षेत्रांत करीत असलेल्या काळे यांच्या कार्याचा गौरवही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. काळे यांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.