सरस्वती महिला पतसंस्था आयोजित, सहकार प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत अलकाताई मुरुमकर प्रथम

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019

   
 
पुणे : येथील सरस्वती महिला पतसंस्थेच्या वतीने सहकार प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहकार भारतीच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत महिला प्रमुख अलकाताई मुरुमकर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत एकूण 37 स्पर्धकांचा सहभाग होता. दि. 2 ते 31 मे या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ नितीन वाणी यांचे स्पर्धेसाठी विशेष सहकार्य मिळाले.
 
स्पर्धेतील द्वितीय क्रमांक हा सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक-सदस्या व माजी अध्यक्षा अनुजा दिवेकर व बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली कदम यांना विभागून देण्यात आला आहे. स्पर्धेत सहकार क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. सरस्वती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुचित्रा दिवाण यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.