पतसंस्था वेल्फेअर असोसिएशनची कार्यशाळा संपन्न

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
शिर्डी : पतसंस्था वेल्फेअर असोसिएशनच्या संचालकांची दोन दिवसीय कार्यशाळा येथे पार पडली. सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगांवकर, अध्यक्ष रविकाका बोरावके, प्रमुख पाहुणे डॉ. शांतीलाल सिंगी होते. असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ लेंभे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सुदर्शन भालेराव यांनी केले.
 
वेल्फेअर असोसिएशनचे कार्य व कामकाज, प्रसार, जास्तीतजास्त संस्था व कर्मचारी यात सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून संचालक या कार्यशाळेला उपस्थित होते. दोन दिवसांतील सत्रात असोशिएसनची कार्ये, कलम 144, नियम 35, कलम 20, यांवर मार्गदर्शन व चर्चा झाली. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सुदर्शन भालेराव, निकम, वासुदेव काळे व योगेश उपासनी यांनी परिश्रम घेतले.