श्रीराम देशपांडे यांची एसईसीएलच्या संचालकपदी निवड

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

धुळे : साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स (एसईसीएल) कंपनीच्या संचालकपदी (स्वतंत्र कार्यभार) श्रीराम देशपांडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. केंद्रीय कोळसा व खनिज मंत्रालयाने तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.
 
छत्तीसगडमधील विलासपूर येथे मुख्यालय असून संपूर्ण देशात सर्वाधिक कोळसा उत्पादन करणारी ही कंपनी आहे. सन 2018-19 या वर्षामध्ये एकूण उत्पादन 144 अब्ज टन झाले आहे, तर वार्षिक उलाढाल 30 हजार 500 कोटी असून करपूर्व नफा 3821 कोटी इतका झाला आहे.