महालक्ष्मी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संदीप कुलकर्णी

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संदीप कुलकर्णी व उपाध्यक्षपदी उदय महेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडणूक झाली.
 
नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप कुलकर्णी व उपाध्यक्ष महेकर यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. बँकेचे सर्व संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते.