फलटण : बुलडाणा अर्बनचे सरव्यवस्थापक राजेश लढ्ढा यांनी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. बँकेच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले.
बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, संचालक तानाजीराव शिंदे, अभिजितभैय्या सूर्यवंशी, गणेश निमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील, सुव्रत देशपांडे, बुलडाणा अर्बनच्या विभागीय व्यवस्थापिका योगिनी पोकळे, मनोहर देशमुख, मालोजीराजे बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.