लोकमंगल सहकारी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
सोलापूर : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कुंदन भोळे व साहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) आबासाहेब गावडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गुरण्णा आप्पाराव तेली यांनी प्रास्ताविक केले. संस्था स्थापनेपासून आजतागायत संस्थेची माहिती सांगितली. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असून संस्थेच्या 40 शाखा व शाखा विस्तार सोलापूर, पुणे व सांगली जिल्ह्यात झाला आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 600 कोटींच्या जवळपास आहेत. 
 
संस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका नितीन देवडकर यांनी प्रोसिडिंग व अहवाल वाचन केले. सदस्यांना 15 टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला एकमताने मंजुरी दिली.
 
शासकीय लेखापरीक्षक दरगड यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली व संस्थेचे कार्य कशा प्रकारे काटेकोरपणे चालते हे समजून सांगितले. श्री. देशमुख यांनी मार्गदर्शन केले, त्यामध्ये सभासदांच्या अडीअडचणी जाणून घेऊन समाधानकारक उत्तरे दिली. सभासद हा संस्थेचा मालक आहे याची जाणीव करून दिली व संस्था व्यक्तिगत नसून आपणा सर्वांची आहे, हे सांगितले. संस्थेचे संचालक गायकवाड युवराज आप्पाराव यांनी आभार मानले. उपाध्यक्ष निर्मला कुंभार व संचालक फैयाज अहमद सरदार मुलाणी, मनीष सुभाष देशमुख, समाधान सुभाष पाटील, शहाजी मोहनराव साठे, युवराज आप्पाराव गायकवाड, रेवन्नप्पा शिवराय व्हनमाणे, सरोजनी विजयकुमार टिपे, सिद्राम नागनाथ देवकुळे, हरिश्‍चंद्र लक्ष्मण गवळी उपस्थित होते. तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव रंगराव पाटील व संस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका नितीन देवडकर, संस्थेच्या सर्व शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.