पाणीपुरवठा कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी कृष्णात मोहिते

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
 
कोल्हापूर : पाणीपुरवठा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक एस.डी. चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली झाली. संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी कृष्णात हिंदुराव मोहिते व उपाध्यक्षपदी राजाराम जगन्नाथ पडळकर यांची एकमताने निवड झाली.
 
श्री राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँकेचे विद्यमान संचालक शशिकांत दिनकर तिवले तसेच संस्थेचे संचालक किरण महादेव सणगर, अण्णा पांडुरंग बराले, वसंत पांडुरंग देवकुळे, मारुती दगडू पाटील, बाळा रामचंद्र पाटील, सुभाष शंकर मोहिते, चंद्रकांत गोपाळ नरके, प्रकाश दरीखान आंबी, कृष्णा रामचंद्र पुजारी, श्रीमती पार्वती शंकर पाटील, सेक्रेटरी ज्ञानदेव महादेव खराडे, संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते.