जनता कमर्शिअल बँकेचे चिखली अर्बनमध्ये विलीनीकरण

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
खामगाव : येथील दि चिखली अर्बन सहकारी बँकेमध्ये जनता कमर्शिअल सहकारी बँकेचे नुकतेच समारंभपूर्वक विलीनीकरण करण्यात आले आहे.
 
राज्याचे कामगारमंत्री डॉ. संजय कुटे, बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, रिझर्व्ह बँक नागपूर विभागाचे महाप्रबंधक श्री.जी. रमेश, आमदार आकाश फुंडकर, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, जिल्हा संघचालक महादेव भोजने, तालुका संघचालक बाळासाहेब काळे, नगर संघचालक नंदकुमार भट्टड, नगरपालिका अध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय पवार आदी या वेळी उपस्थित होते.
 
बँकेचे अध्यक्ष गुप्त यांनी असे सांगितले की, ठेवीदारांचे हित हेच प्रथम कर्तव्य आहे. विश्‍वस्त म्हणून काम करत असताना गोरगरीब जनतेने बँकेवर विश्‍वास ठेवून आपल्या कमाईतील पैन्पै बँकेत ठेवलेली असते आणि त्याचे रक्षण करणे आमचे प्रथम कर्तव्य आहे.
रिझर्व्ह बँकेचे नागपूर विभागाचे महाप्रबंधक मा. श्री. जी. रमेश यांनी बँकेला शुभेच्छा दिल्या. विदर्भात बँक खूप चांगल्या प्रतीचे काम करत आहे आणि यापुढेसुद्धा करेल अशी आशा या वेळी त्यांनी व्यक्त केली.
 
डॉ. कुटे यांनी बँकेचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व महिला स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. गोरगरीब जनतेसाठी राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा सहकारी बँका खूप चांगले काम करत असल्याचे सांगितले.
 
नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद भारंभे, चिखली नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रिया बोंद्रे, ज्येेष्ठ माजी संचालक भाऊसाहेब लाहोटी, विजुभाऊ कोठारी, प्रेमराजजी भाला, बँकेचे संचालक मंडळ, अनेक पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, खामगाव नगरीतील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी सोहळ्याला उपस्थित होत्या.