जळगाव जनता बँकेच्या भडगाव शाखेचे उद्घाटन

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019
 
 
जळगाव : जनता बँकेच्या भडगाव शाखेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी रा. स्व. संघ जळगाव जिल्हा सहसंघचालक डॉ. निलेश पाटील, विद्यमान नगराध्यक्ष अतुल पाटील, जे.डी.सी.सी. बँकेचे विद्यमान संचालक नानासाहेब देशमुख, जे.डी.सी.सी. बँकेचे माजी संचालक मेहताबसिंग नाईक, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, संचालक सतीश मदाने, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील होते.
 
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविकात बँकेविषयी माहिती विशद करून उपस्थितांना बँकेच्या संचालक तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा परिचय करून दिला. बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
 
बँकेचा एकत्रित व्यवसाय सुमारे 2,651 कोटींवर असून एन.पी.ए.सुद्धा 1 टक्क्याच्या आत आहे. बँकेमार्फत बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे देखील काम मोठ्या प्रमाणात केले जाते. भडगाव शाखेच्या परिसरातील नागरिकांनी आपले खाते शाखेत सुरू करावे व बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून हे सर्व बँकेचा पारदर्शक व्यवहार व बँकेचे सभासद ग्राहक व हितचिंतक यांच्या विश्‍वासामुळेच साध्य होत आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
 
आभार भडगाव शाखेचे शाखाधिकारी हेमराज पागरे यांनी मानले, तर सूत्रसंचालन बँकेच्या अधिकारी स्वाती भावसार यांनी केले.