शेतकर्‍यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : सतीश मराठे

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
शहादा : परस्पर स्नेह, विश्‍वास आणि समाजाचे कल्याण हा सहकाराचा पाया आहे. कृषी, उद्योग आणि प्रक्रियेच्या क्षेत्रात नव्या दमाने काम करण्याची वेळ आली आहे. शेती उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करून सहकारातून समृद्धी साधता येणार असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केले.
 
श्री सातपुडा-तापी परिसर सहकारी साखर कारखाना आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘सातपुडा’चे अध्यक्ष दीपकभाई पाटील होते. सहकार भारतीचे अखिल भारतीय प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला, सहसंपर्क प्रमुख दिलीपदादा पाटील, संघटमंत्री विनय खटावकर, उत्तर महाराष्ट्र कोषाध्यक्ष गोपाळराव केले, संघटन प्रमुख दिलीप लोहार, धुळे येथील सीए श्रीराम देशपांडे, धुळे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विनोद सोनार, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, पं. स. सभापती दरबारसिंग पवार, माजी सभापती माधव पाटील, दीनदयाल पतसंस्थेचे डॉ. कांतीलाल टाटीया, महावीर पतसंस्थेचे रमेशचंद चोरडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
मराठे म्हणाले की, आज सुमारे 35 हजार छोट्या-मोठ्या सहकारी संस्थांची नोंदणी झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात-निर्यातीच्या सतत बदलत जाणार्‍या धोरणामुळे कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. परदेशांत शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण 60 टक्के आहे. मात्र, भारतात हे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी, देशात विकास अल्प होतो. आज कृषी उत्पादनांसह दूध उत्पादन व मत्स्योद्योगावर प्रक्रिया करून उत्पन्नवाढीसाठी संधी आहे. आपल्या देशातही अन्न प्रक्रिया उद्योगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे, असेही ते म्हणाले.
 
दीपकभाई पाटील म्हणाले की, सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासीबहुल भागात स्व. पी. के. अण्णा पाटील यांनी सहकाराची रुजवणूक केली. पक्ष तसेच व्यक्तिभेदविरहित कार्य केल्याने असंख्य हातांना रोजगार मिळाला. इमानदारी हा आमचा संस्कार असून या शिकवणुकीवर वाटचाल सुरू आहे. संकटांचा सामना करत आम्ही प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी सदैव तयार आहोत. सहकारातून समाजाचा विकास साध्य करणे आपले ध्येय आहे, असेही ते म्हणाले. या वेळी दिलीपदादा पाटील, संजय बिर्ला यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक ‘सातपुडा’चे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले, तर आभार संग्रामसिंग राजपूत यांनी मानले.
 
मेळाव्यास बाजार समिती सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा. चेअरमन जगदीश पाटील, पुरुषोत्तमनगरच्या सरपंच ज्योतीबेन पाटील. जि. प. समाजकल्याण सभापती दिलीप बागले, प्रा. एल. एस सय्यद, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुंवर, नगरसेवक प्रा. मकरंद पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्‍वर चौधरी, अजय शर्मा, डॉ. हेमंत सोनी, दूध संघाचे माजी अध्यक्ष उद्धव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर मोरे, ईश्‍वर पाटील, रवींद्र चौधरी, डॉ. खलील शाह, प्रा. डॉ. मनोज गायकवाड, मंदाणेचे उपसरपंच अनिल भामरे, प्रा. अनिल साळुंके, हिरालाल अहिरे, अरविंद पाटील, आनंदराव पाटील आदींसह सहकार व कृषी क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.