दि विश्‍वेश्‍वर सहकारी बँकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019
पुणे : दि विश्‍वेश्‍वर सहकारी बँकेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. बँकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी सांगितले की, मार्च 2019 अखेर बँकेच्या ठेवी रु. 1523 कोटी असून, कर्जे रु. 857 कोटी आहेत. एकूण व्यवसाय रु. 2380 कोटी झाला आहे. बँकेचा उठअठ 17.91% असून, बँकेचा सकल नफा रु 29.07 कोटी आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसायवाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा संकल्प केला आहे. तसेच बँकेने सिंहगड रोड शाखेत कॅश स्वीकारून एटीएमसारखे पेमेंट करणारे ठशलूलश्रशी मशीन ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. ज्येष्ठ संचालक सुनिल रुकारी आणि बँकेचे सभासद व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी मार्गदर्शन केले. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा आणि विविध क्षेत्रांत यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष श्री. मनोज साखरे यांनी आभार मानले.