दि महाराष्ट्र ऐक्यवर्धक पतसंस्थेला 25 लाखांचा नफा

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:30-Oct-2019
 
 
मुंबई : दि महाराष्ट्रीय ऐक्यवर्धक सहकारी पतपेढी या संस्थेची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र अर्जुन पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पतपेढीने सन 2018-2019 या आर्थिक वर्षात तीन कोटींचा व्यवसाय केला आहे. पतसंस्थेला 25 लाख 77 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव गजानन विठोबा खरात यांनी जाहीर केले. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा अहवाल सभासदांसमोर मांडला असून संस्थेने 16 कोटी 77 लाखांचा टप्पा पार केला असल्याचे सांगण्यात आले.
 
संस्थेचे अध्यक्ष पोकळे यांनी स्वागत केले व अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सचिव गजानन खरात यांनी सन 2017-18 या मागील वर्षाचे इतिवृत्त मांडले. सन 2018-19 या आर्थिक वर्षाचे ताळेबंदपत्रक, नफातोटापत्रक, नफाविभागणी, दोष दुरुस्ती अहवाल, सभासदांच्या मुलांना प्रमाणपत्र वाटप, सन 2019-20 च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
 
सन 2018-19 या आर्थिक वर्षात विविध प्रकारचे उपक्रम राबवून 21 कोटी 44 लाखांपर्यंत संमिश्र व्यवसाय केल्याने खातेदार, सभासद, ठेवीदार यांच्या विश्‍वासाचे प्रतीक असल्याचे अध्यक्ष पोकळे, सचिव गजानन खरात व संचालक मंडळ सदस्य यांनी सांगितले.
 
सभासदांच्या नववी ते पदवीपर्यंतच्या मुलांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम सर्व आजी-माजी पदाधिकारी व सभासदांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
 
संस्थेला सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळत आहे. संस्थेचे आजी, माजी संचालक, सदस्य, सभासद, ठेवीदार तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष भालचंद्र पोकळे, उपाध्यक्ष नरेंद्र कांबळे, सचिव गजानन खरात, संचालक विलास मयेकर, बाळकृष्ण माने, संतोष गुप्ता, संचालिका सुवर्णा मोरे, नीता माने, तज्ज्ञ संचालक प्रभाकर कांबळे, विलास शेळके, व्यवस्थापक संभाजी खेसे, कर्मचारी संगीता जंगम, स्मिता शिंदे, संदीप औटी, प्रतिक सुर्वे आदींनी परिश्रम घेतले.