राज्य सहकारी बँक असोसिएशन संचालकांची यवतमाळ अर्बन बँकेला सदिच्छा भेट

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:30-Oct-2019

 
 
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक मंडळाने यवतमाळ अर्बन बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, संचालक सर्वश्री विकासभाई सावंत, डॉ. तर्‍हाळे, रूपाताई जगताप, अ‍ॅड. आवटे, प्रचीत पोरेड्डीवार, रविंद्र दुरूगकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे यांचा समावेश होता.
 
बँकेच्या वतीने अध्यक्ष अजय मुंधडा, उपाध्यक्ष आशिष उत्तरवार, संचालक नितीन खर्चे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडे सहा. सरव्यवस्थापक भगवान गोन्टीमुकुलवार, राम गायकवाड, अनिल शेंडे, गजानन वैद्य, श्यामजी दाणी यांनी स्वागत केले. श्री. मुंधडा यांनी बँकेची तसेच सामाजिक उपक्रमातील बँकेच्या योगदानाची माहिती दिली. सहकारी बँकांसमोरील आव्हाने व नवनवीन तंत्रज्ञान, संचालक व कर्मचारी प्रशिक्षण या विषयांवर चर्चा झाली.
 
सूत्रसंचालन साहाय्यक सरव्यवस्थापक गजानन वैद्य यांनी केले. आभार सहा. सरव्यवस्थापक राम गायकवाड यांनी मानले.