स्मिता देशपांडे यांना उत्कृष्ट बँक कर्मचारी पुरस्कार प्रदान

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:14-Mar-2018
 
 
मुंबई : दि महाराष्ट्र राज्य को ऑप. बँक्स असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे कै. बापू रावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार सन 2016-17 हा भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्मिता देशपांडे यांना मुंबई येथे रविंद्र नाट्य मदिर येथेे झालेल्या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
सहकार सुगंध, महाराष्ट्र राज्य महिला महासंघ व भगिनी निवेदिता सहकारी बँक परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमात अन्य पुरस्कारही पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.