सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सहकार ध्वज प्रदान
स्रोत: सहकार सुगंध         तारीख:14-Mar-2018

 
यवतमाळ : सहकार भारती संपर्क अभियानांतर्गत राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांना सहकार ध्वज प्रदान करण्यात आला. येथे शासकीय दौर्यानिमित्त आलेल्या सहकारमंत्र्यांना यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात चालू असलेल्या विविध कार्यक्रम, उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री मदनभाऊ येरावार, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.
 
सहकार भारतीच्या विदर्भ प्रांत महिला प्रमुख सुजाता महाजन, प्रांत कार्यकारिणी सदस्य तथा बाबाजी दाते महिला बँकेच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई केळकर, यवतमाळ जिल्हा सचिव राम साकळे, उपाध्यक्षा वीणा देशपांडे, संघटक सुशील सरूरकर, कोषप्रमुख राकेश मिश्रा व विविध संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.