महेश महिला नागरी सह. पतसंस्थेची रौप्यमहोत्सवी वाटचाल
स्रोत: सहकार सुगंध         तारीख:14-Mar-2018
लक्ष्मीध्वज: विजयते हे ब्रीदवाक्य ठेवून महेश महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल १९९४ साली सुरू झाली. २००३ पासून अॅड. सौ. शोभाताई लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली काम वेगाने सुरू झाले. एका छोट्याशा जागेत सुरू झालेली संस्था अल्पावधीत पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्ववास्तूमध्ये स्थलांतरीत झाली. ३००० चौ. फू. जागेत संस्थेचे मुख्य कार्यालय व नाना पेठ शाखा कार्यरत आहे. पतसंस्थेची लॉकर सुविधा सभासदांसाठी उपलब्ध आहे. पतसंस्थेच्या एकूण तीन शाखा असून चालू वर्षी तीन नवीन शाखांना मंजुरी मिळालेली आहे.
 
उपाध्यक्षा उर्मिला तोष्णीवाल व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, सर्व सभासद सल्लागार व हितचिंतक यांच्या सहकार्याने संस्थेचा आलेख नेहमी चढता ठेवला आहे. संस्थेने कायम ‘अ’ वर्ग टिकवला आहे. पुढील आर्थिक वर्ष पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे अनेक नवीन योजना पूर्ण करण्याचा संस्थेचा निश्चय आहे. अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी पतसंस्था मोठी आधारच ठरली. सावकारी कर्जातून महिलांची सुटका झाली. नवनवीन कर्जे तसेच ठेव योजना राबवण्यात आल्या. आत्तापर्यंत ४५०० पेक्षा जास्त महिलांना बचत गटांच्या माध्यमातून कर्जरूपाने ४ कोटी रु. दिले.
 
संस्थेचे एकूण भागभांडवल रु.१ कोटी ६४ लाख, स्वनिधी ३ कोटी ५० लाख, ठेवी २७ कोटींपेक्षा जास्त, कर्जवाटप २३ कोटी, गुंतवणुक ९ कोटी ५० लाख आहे. संस्थेच्या सर्व शाखा मुख्य कार्यालयाशी सी.बी.एस. प्रणालीने जोडलेल्या आहेत. तसेच सर्व सभासद, ठेवीदार व कर्जदारांसाठी मोबाइल अॅप, एटीएम यांसारख्या अद्ययावत सुविधा सुरू करण्याचा मानस आहे.