खामगाव अर्बन बँकेचे डाटा सेंटर कार्यरत

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:14-Mar-2018

 
 
खामगाव : खामगाव अर्बन बँकेने सुसज्ज डाटा सेंटर उभारून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना अधिकाधिक जलद सेवा देण्याचे दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बँक लवकरच मुंबई, अहमदाबाद, राजकोटसारख्या व्यापारी शहरांत शाखाविस्तार करेल, असा विश्वास सहकार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता यांनी खामगाव अर्बन बँक मुख्य कार्यालय येथे इमारत नूतनीकरण व डाटा सेंटरचे उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आशिष चौबिसा होते.
 
 
 
व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक रामजी हरकरे, महाराष्ट्र राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष चौबिसा यांनी खामगाव अर्बन बँक ही आर्थिक संस्था असूनही बँकेने सामाजिक बांधिलकी सदैव जोपासली आहे. बँक समाजातील सर्व घटकांच्या उत्थानासाठी कार्य करीत असल्याचे सांगितले व बँकेच्या प्रगतीबाबत तसेच बँकेने उभारलेल्या डाटा सेंटरच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती दिली.
 
बँकेने स्वच्छतेकरिता खामगावच्या बस स्थानकाचे पालकत्व स्वीकारले असून कार्यक्रमात खामगाव नगर परिषदेला 100 डस्ट बिनचे नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे यांना वितरण करण्यात आले. या वेळी फुंडकर यांनी सांगितले की, बँकेने कठीण परिस्थितीवर मात करून नेत्रदीपक प्रगती साधली आहे.
  

 
बँकेची ही भरारी इतर संस्थांसाठी प्रेरणादायी असून संचालक मंडळ व कर्मचारी यांची मेहनत व खातेदारांचा विश्वास, यांमुळेच ही प्रगती साधली असल्याचे सांगितले. विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, जिल्हा संघचालक महादेवराव भोजने, नगर संघचालक डॉ. नंदकिशोर भट्टड, उपाध्यक्ष गोविंद जोग, संचालक कन्हैयालाल पारीक, मोहनराव कुळकर्णी, चेतन लोडाया, पुरुषोत्तम काळे, बापूसाहेब खराटे, धुंडिराज बर्वे, सौ. विजयाताई राठी, सौ. सुचेताताई हातेकर, डॉ. सतिश कुळकर्णी, पवन झुनझुनवाला, रविंद्र देशपांडे, राजेश्वर रेलकर, प्रबंध संचालक अरुण दुधाट, सरव्यवस्थापक पांडुरंग खिरोडकर, उपसरव्यवस्थापक आदिनाथ किनगे, आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाठक, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त, नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद भारंबे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री निळकंठ देवांगण, सहकार भारतीचे पदाधिकारी, नगराध्यक्षा अनिताताई डवरे आदी उपस्थित होते. आभार प्रबंध संचालक अरुण दुधाट यांनी, तर सूत्रसंचालन शेखर कुळकर्णी यांनी केले.