About Us

अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या सहकार भारतीचे मुखपत्र असलेले ’सहकार सुगंध’ हे मासिक गेल्या 13 वर्षांपासून प्रसिद्ध होत आहे. सहकार चळवळीच्या निकोप व गुणात्मक वाढीसाठी सहकार भारती 1978 पासून संपूर्ण देशभर कार्य करीत आहे. सहकार चळवळीचा सचित्र वृत्तांत, सहकार विषयक घडामोडी, बातम्या, लेख इ. सर्व बाबींचा समावेश असलेले ’सहकार सुगंध’ हे मासिक (मराठी आवृत्ती) महाराष्ट्रात सर्वच सहकारी संस्थांमध्ये वितरित होते. याबरोबरच हिंदी-इंग्रजी संयुक्त भाषेत देखील सहकार सुगंधची स्वतंत्र आवृत्ती संपूर्ण देशात वितरित केली जात आहे.

सहकार चळवळीतील एक घटक म्हणून आपला सक्रीय सहभाग या मासिकासाठी हवा आहे. मासिकाचे वर्गणीदार, वाचक होऊन तो आपण करालच, त्याचबरोबर सहकार विषयक घडामोडी, लेख, बातम्या पाठवून देखील आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. सहकारी संस्थांसंबंधीच्या अडचणी-प्रश्नाची देखील सोडवणूक करणारे हे एक व्यासपीठ आहे, त्यामुळे आपण आपले प्रश्न, शंका, अडचणी आमच्याकडे जरूर पाठवाव्यात, ज्याला निश्चित प्रसिद्धी देखील मिळेल आणि त्यावर सहकारातील तज्ञ, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळेल. सध्या शंका-समाधान सदरातून नियमितपणे प्रसिद्धही केले जात आहे.

सहकार सुगंधमधून महाराष्ट्र राज्य-सहकार खात्याकडून जारी केली जाणारी परिपत्रके, रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकांचा मराठीतून स्पष्टीकरणासह अर्थ नियमितपणे प्रसिद्ध केला जात आहे. नागरी सहकारी बँका, पतसंस्था यासाठी दरवर्षीच्या वार्षिक अहवालावर आधारीत ’प्रतिबिंब’ अहवाल स्पर्धा घेतली जाते. त्यासही चांगला प्रतिसाद लाभत आहे.

दिनांक 1/4/2017 पासून सहकार सुगंधच्या वर्गणीचे नवीन दर पुढीलप्रमाणे आहेत -

वार्षिक रु. 300/- व त्रैवार्षिक रु. 800/-

आपण पुढीलपैकी कोणत्याही पध्दतीने वर्गणी भरु / पाठवू शकता.

1) www.payyoursubscription.com या वेबसाईटद्वारा online subscription आपण थेट भरू शकता.

2) स्टेट बँक ऑफ इंडिया- शाखा हिंगणे खुर्द, पुणे. या शाखेतील ’सहकार प्रिंटींग अँड पब्लिकेशन्स प्रा. लि.’-चालू खाते क्र. 36931889346 (IFSC SBIN0007159) यामध्ये रोख अथवा चेकद्वारा भरू शकता.

3) सहकार सुगंधच्या पत्त्यावर मनिऑर्डर किंवा चेक ’सहकार प्रिंटींग अँड पब्लिकेशन्स प्रा. लि.’ या नावाने पाठवावा.

कृपया वर्गणी भरल्यानंतर किंवा पाठवल्यानंतर कार्यालयात मोबा. क्र. 8805981673 वर तसेच ईमेल द्वारा आपले नांव व पूर्ण पत्ता [email protected] वर कळवावे, ही विनंती.